शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

देशात तीन वर्षांत १३ लाख मुली आणि महिला बेपत्ता, 'या' राज्यातून सर्वाधिक; केंद्र सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 6:19 PM

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशभरातून १३.१३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतून दरवर्षी हजारो मुली व महिला बेपत्ता होत आहेत. त्या कुठे जात आहे, काय करत आहे, त्यांच्यासोबत काय होत आहे, यासंदर्भात कोणालाच माहीत नाही. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत यासंबंधी काही आकडेवारी सादर केली आहे, ज्यावरून असे दिसून येते की २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशभरातून १३.१३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या १०,६१,६४८ मुली आणि महिला १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. तर २,५१,४३० या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. बेपत्ता मुलींच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत राजधानी दिल्लीचेही नाव आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०१९ ते २०२१ या कालावधीत मध्य प्रदेशात एकूण १,६०,१८० महिला आणि ३८,२३४ मुली बेपत्ता झाल्या आहेत. 

याचबरोबर, पश्चिम बंगालमध्ये याच कालावधीत एकूण १,५६,९०५ महिला आणि ३६,६०६ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात हरवलेल्या मुली आणि महिलांची संख्या अनुक्रमे १३,०३३ आणि १,७८,४०० आहे. याशिवाय, २०१९ ते २०२१ दरम्यान ओडिशात एकूण ७०,२२२ महिला आणि ६१,६४९ मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. तर छत्तीसगडमध्ये ४९,११६ महिला आणि १०,८१७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. 

दिल्लीत सुद्धा अनेक मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. देशातील इतर केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत दिल्लीत सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिल्लीत २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत ६१,०५४ महिला आणि २२,९१९ मुली बेपत्ता झाल्या. तर जम्मू-काश्मीरमध्ये ८,६१७ महिला आणि १,१४८ मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती - केंद्र सरकारदेशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे. ज्यामध्ये लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी पूर्वीचे कायदे दुरुस्त करून ते अधिक कडक करण्यात आले आहेत. यासोबतच १२ वर्षांखालील मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेत दोषींना फाशीच्या शिक्षेसह इतर अनेक कठोर शिक्षेच्या तरतुदीही निश्चित करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी