केरळमधील गर्भवरी हत्तीण, हिमाचल प्रदेशमधील गर्भवती गाय या प्रसंगानं देशभरात संताप व्यक्त होत असताना माणुसकीचा अंत झाल्याची प्रचिती देणारे प्रसंग रोज समोर येत आहेत. सोमवारी गुवाहाटी येथे स्थानिकांनी बिबट्याची निर्घृण हत्या केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आणि इतरांचा शोध सुरू आहे. आता आणखी एक मन विचलीत करणारी घटना घडली आहे. आसाममधील चचर जिल्ह्यात एका पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत आढळली. त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
स्थानिक पोलीस आणि वनविभागानं या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. करिमगंज विभागीय वन क्षेत्रातील कलैन येथील कटीरेल जवळ ही घटना घडली. येथील पाण्याच्या टाकीत 13 माकडांचे शव आढळल्यानं एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी लगेच पोलीस व वन विभागाला याबाबत कळवले. वन अधिकाऱ्यांनी माकडांची शव ताब्यात घेतली असून ती शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत.
करिमगंज विभागीय वन अधिकारी जलनूर अली यांनी सांगितले की,''ही घटना मन सून्न करणारी आहे आणि विभागानं त्याचा तपास सुरू केला आहे. हे येथील स्थानिक माकडं आहेत आणि त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.''
दुसरीकडे काही लोकांनी या माकडांवर विषप्रयोग केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
Broom Broom... महेंद्रसिंग धोनीचं Bike कलेक्शन अन् त्यासाठी उभारलाय अलिशान बंगला!
दरम्यान, गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काही स्थानिक लोक एका बिबट्याच्या मृत शरिरासह डान्स करताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार या स्थानिकांनी बिबट्याची निर्दयीपणे हत्या केली आणि दात अन् नखही ठेवली नाही. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे. याच घटनेला दुजोरा देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोहम्मद जुबैर याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ही लोकं बिबट्याच्या मृतदेहासह डान्स करताना दिसत आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.