प्रभाग तोडल्याबाबत सर्वाधिक हरकती चाळीसगावचे १३ जण हजर : जिल्हाधिकार्यांकडे झाली सुनावणी
By admin | Published: July 19, 2016 11:40 PM
जळगाव : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना व जनगणना याबाबत चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील हरकतींवर मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. नवीन प्रभागात मतदारांचे नाव टाकणे, प्रभाग तोडणे, जास्त लोकसंख्या असलेल्या प्रभागात आरक्षण जाहीर न करणे अशा हरकतींचा समावेश होता.
जळगाव : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना व जनगणना याबाबत चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील हरकतींवर मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासमोर सुनावणी झाली. नवीन प्रभागात मतदारांचे नाव टाकणे, प्रभाग तोडणे, जास्त लोकसंख्या असलेल्या प्रभागात आरक्षण जाहीर न करणे अशा हरकतींचा समावेश होता.चाळीसगाव नगरपालिका क्षेत्रातील ३८ जणांनी प्रभाग रचना, सदस्य आरक्षण या संदर्भात हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. मंगळवारी केवळ १३ तक्रारदार हजर होते. तर २५ जण गैरहजर होते. यात जुन्या वॉर्डातील मतदार नवीन वॉर्डात टाकले, प्रभाग तोडणे, जास्त लोकसंख्या असताना दुसर्या प्रभागात आरक्षण जाहीर करणे अशा हरकती घेण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकार्यांनी हरकतदार तसेच मुख्याधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले. या हरकतींबाबत सुनावणी झाल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.