शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

१३ उपग्रहांचे शत्रूंवर लक्ष!

By admin | Published: June 27, 2017 12:37 AM

कार्टोसॅट-2 ई या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विशेषत: लष्करी उद्देशांसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपग्रहांची संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कार्टोसॅट-2 ई या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विशेषत: लष्करी उद्देशांसाठी वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपग्रहांची संख्या १३ झाली असल्याची माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे. टेहळणी व सीमा भागांतील नकाशांचे रेखांकन करण्याबरोबरच शत्रूच्या जमीन आणि समुद्रातील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे. लष्करी उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणारे हे उपग्रह पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत स्थिर करण्यात आले आहेत. गेल्या शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेला कार्टोसॅट-2 मालिकेतील उपग्रह ७१२ किलो वजनाचा असून, गरजेनुसार विशिष्ट अशा भागांचे उच्च दर्जांची छायाचित्रे पाठवण्याची क्षमता त्यात आहे. कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रह खास लष्करी उद्देशासाठी वापरण्यात येत आहेत. भारतीय नौदलही विविध भागांमध्ये तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी जीसॅट-7 या उपग्रहाचा वापर करते. भारताकडे आज उपग्रहविरोधी अस्त्र डागण्याची क्षमता आहे, ज्यात शत्रूचा उपग्रह नष्ट करता येतो. आजच्या घडीला अशी क्षमता अमेरिका, रशिया व चीन या देशांकडेच आहे. शक्य असूनही इस्त्रोला सध्या तरी अशा उपग्रहविरोधी तंत्रज्ञानामध्ये पडण्याची इच्छा नाही. इस्त्रो नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करते, असे स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक तपन मिश्रा यांनी सांगितले. इस्रोने शुक्रवारी सकाळी पीएसएलव्ही-सी३८ अग्निबाणाद्वारे ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण केल्यानंतर पीएसएलव्हीने कार्टोसॅट-२ सह अन्य २९ छोट्या उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडले. इस्रोच्या पीएसएलव्हीचे हे ४० वे उड्डाण होते. या ३१ मध्ये भारताचे दोन व २९ परदेशी उपग्रह आहेत.