मुंबई : वय वर्ष 13. हे खेळण्याचे-बागडण्याचे वय. पण घरी अठरा विश्व दारीद्र्य. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. कोवळ्या वयात घर चालवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी बॉक्सिंग खेळून त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. पण ही गोष्ट करत असताना अवघ्या तेराव्या वर्षात त्याला मृत्यूने गाठले.
दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. दुखापतीमुळे खेळाडूंना काही काळ खेळापासून लांब राहावे लागते. काही खेळाडूंचा तर मैदानात झालेल्या दुखापतींमुळे मृत्यूही होतो. अशीच एक घटना घडली आहे. 13 वर्षांच्या बॉक्सरचा खेळताना झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अनुचा थासाको, हे त्याला 13 वर्षाच्या बॉक्सरचे नाव. हा प्रकार घडला तो थायलंडमध्ये. थाय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात. थाय बॉक्सिंग खेळत असताना थासाकोच्या डोक्याला फटका बसला. त्यानंतर त्याला ब्रेन हॅमरेज झाले आणि दोन दिवसांत त्याचा मृत्यू झाला.