नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत 1,396 नवे रुग्ण आढळून आले असून 381 लोक ठणठणीत बरे झाले आहेत. याबरोबरच आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27,892 वर पोहोचली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेटही वाढला असून तो 22.17 वर पोहोचला आहे.
85 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही -देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तर 85 जिल्हे असे आहेत, जेथे गेल्या 14 दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही.
याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी
उत्तर प्रदेशात 1955 पॉजिटिव्ह रुग्ण -उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथे सध्या 1,589 कोरोना रुग्ण आहेत. तर 335 लोक बरे झाले आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील 59 जिल्ह्यांत आतापर्यंत एकूण 1955 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज येथील झासी जिल्हाही संक्रमित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री
बिहारमध्ये 17 नवे रुग्ण आढळले -बिहारचे मुख्य आरोग्य सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बिहारमध्ये 17 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 307वर पोहोचला आहे. आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये मुंगेर येथील 9, मधुबनी येथील 5 तर लखीसराय येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!