ंआक्षेप १४ कोटींचे, तक्रार २०९ कोटींची गोलाणी प्रकरण: आयुक्तांनी मनमानी पद्धतीने फुगवली आकडेवारी
By admin | Published: August 01, 2016 11:57 PM
जळगाव: गोलाणी व सतरा मजली बांधकाम प्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी राजकीय दबावापोटी मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून मनपाच्या नुकसानीची आकडेवारी व्याज समाविष्ट करीत सोयीस्करपणे फुगवून दाखवित तब्बल २०९ कोटींची तक्रार शहर पोलिसांत दिली. तर त्यानंतर प्राप्त झालेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालात आक्षेप नोंदविलेली रक्कम केवळ १४ कोटींची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गोलाणी ब्रदर्स यांना अदा करण्यात आलेल्या रकमेच्या आकड्यातही आयुक्तांची तक्रार व विशेष लेखापरिक्षण अहवालात तफावत आहे.
जळगाव: गोलाणी व सतरा मजली बांधकाम प्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी राजकीय दबावापोटी मुख्य लेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या माध्यमातून मनपाच्या नुकसानीची आकडेवारी व्याज समाविष्ट करीत सोयीस्करपणे फुगवून दाखवित तब्बल २०९ कोटींची तक्रार शहर पोलिसांत दिली. तर त्यानंतर प्राप्त झालेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालात आक्षेप नोंदविलेली रक्कम केवळ १४ कोटींची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गोलाणी ब्रदर्स यांना अदा करण्यात आलेल्या रकमेच्या आकड्यातही आयुक्तांची तक्रार व विशेष लेखापरिक्षण अहवालात तफावत आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या याचिकेत न्यायालयाने तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री माने यांच्या आदेशानंतर मनपाने मक्तेदाराला किती रक्कम अदा केली? ते रेकॉर्डवर नसल्याने आयुक्तांनी त्याबाबतच्या आकडेवारीसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात कुठेही या योजनेच्या लेखापरीक्षण करण्याचे अथवा पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश नव्हते. मात्र तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी आवश्यकता नसतानाही केवळ राजकीय दबावापोटी याप्रकरणी तत्कालीन मुख्य लेखापरिक्षक सुभाष भोर यांच्यासह ५ अधिकार्यांची समिती नेमून या योजनेचे लेखापरीक्षण केले. विशेष म्हणजे या लेखापरीक्षणाच्या अहवालाच्या अनुषंगाने तक्रार न देता विशेष लेखापरीक्षण करावे, अशी स्पष्ट सूचना समितीने अहवालातच केलेली असताही ती डावलून पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यातही मूळ रकमांवर भरमसाठ व्याजाची रक्कम नुकसान म्हणून दाखवित तब्बल २०८ कोटी ८१ लाख, १९ हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवालाशिवाय गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाकडे विशेष लेखापरीक्षणाची मागणी करण्यात आली. या विशेष लेखापरीक्षण अहवालात मात्र केवळ १३ कोटी ६६ लाख ६० हजार ४७ रुपये इतक्या रकमेच्या व्यवहारावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यातही या पथकाला पुरेसी कागदपत्र पुरविली गेलेली नाहीत. अन्यथा यातील अनेक आक्षेपांचे त्याच वेळी निरसन झाले असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. आकडेवारीतील तफावतअ.क्र. शिर्ष चौकशी अहवालाच्या अनुषंगाने नुकसान विशेष लेखापरीक्षण अहवालात आक्षेप मूळ रक्कम व्याजासह नुकसान १) गोलाणी ब्रदर्स यांना अदा करण्यात आलेली रक्कम ११,३४.६९,७४६ ७७,५४,८७, ६५० १२,७६,३१, ३४४२) आर्किटेक्ट काबरे-चौधरी यांना अदा केलेली रक्कम ५२,८०,९५२ ६,४९,९७,५८९ ८०,७६,८०१३) प्रोजेक्ट इंजिनियर पी.आय. भंगाळे यांना अदा केलेली रक्कम ७,४८,५६६ ६९,०८,७९५ ९,५१, ९०२४) विकासकाने काम मुदतीत न केल्याने दंडाची रक्कम ८,२०, ००,००० १०३,०७,५६,६६१ --५) दुकान ारक्षणाचे विकासकाचे काम नव्याने रचत हाती घेतल्याने झालेले नुकसान -- २०,९९,६८,५५३ -- एकूण -- २०८,८१,१९,२४९ १३,६६,६०,०४७७