ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. ३१ - बांधकाम सुरु असलेला फ्लायओव्हर कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मलब्याखाली अजून लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य सुरु आहे. अडकलेल्या काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती अधिका-यांनी व्यक्त केली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीप्रमाणे 150 हून अधिक लोक अडकले असल्याची माहिती एका प्रत्यकदर्शीन दिली आहे.
आम्हाला मोठा आवाज ऐकू आला त्यानंतर सगळीकडे धुळ दिसत होती असं तेथील एका रहिवाशाने सांगितलं आहे. हा फ्लायओव्हर बडाबाजार परिसरात असून गणेश टॉकीजजवळ आहे. याठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या अपघातात मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचावकार्य सुरु आहे. लोकांनीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
WATCH: Rescue ops underway for those trapped under debris after under-construction bridge collapses in North Kolkatahttps://t.co/t96fZB3Qpr— ANI (@ANI_news) March 31, 2016
Under-construction bridge collapses in North Kolkata near Ganesh Talkies(Girish Park),10 dead. Rescue operation on pic.twitter.com/8tO1lq8UEH— ANI (@ANI_news) March 31, 2016