नवी दिल्ली : अमेरिकेसारखा विकसित देश असो वा भारतासारखा विकसनशील देश, तिथे मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १४ टक्के लोक कोणत्या कोणत्या मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. मात्र, या रुग्णांपैकी ८० टक्के लोक स्वत:वर उपचार करून घेण्यास टाळाटाळ करतात. ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज या अहवालानुसार जगातील दर सात व्यक्तीमागे १ व्यक्ती म्हणजे १५ टक्के लोकसंख्या मानसिक आजारांशी झुंजत आहे. भारतातील अशा रुग्णांच्या आकडेवारीत २०१४ सालानंतर घट होऊ लागली होती. मात्र, २०१९ सालामध्ये देशातील १३.७३ टक्के म्हणजे १४ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजारांनी त्रस्त होते.
भारतात महिला रुग्णांची संख्या अधिकदेशात मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. भारतातील पुरुषांमध्ये १४.४६ टक्के, तर महिलांपैकी १४.५७ टक्के लोक, तर अमेरिकेतील पुरुषवर्गापैकी १६.२६ टक्के व महिलांपैकी १८.३५ टक्के जण मानसिक विकारांनी त्रस्त आहेत.