शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:15 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल.

Bharat Jodo Yatra: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसदेखील गुरुवारी नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. तसेच, पुढील महिन्यापासून राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर रवाना होत आहेत. राहुल गांधी 14 जानेवारीला मणिपूरपासून यात्रा सुरू करतील तर  20 मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होईल. 

गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर, असा सुमारे 3900 किलोमीटरचा प्रवास केला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदयात्रा काढली होती. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. यादरम्यान, राहुल गांधींनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवास केला. या दौऱ्याचा दक्षिण भारतात काँग्रेसला राजकीय फायदा झाला.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. यादरम्यान, मणिपूर ते मुंबई 6200 किलोमीटरचा प्रवास 67 दिवसांत करणार आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व-पश्चिम, असा 14 राज्यांमधील लोकसभेच्या 355 जागा जिंकण्यावर काँग्रेसचा फोकस आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे राहुल गांधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला राजकीय जीवदान देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या राज्यातून जाणारराहुल गांधीची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोड यात्रेदरम्यान राहुल गांधींनी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही, हे तीन मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी भारत न्याय यात्रेत आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय असेल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा