अहमदाबाद - अदाणी समुहाच्या विक्रमी १४,००० कर्मचाऱ्यांनी अदाणी समुहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त देशभरातील विविध ठिकाण रक्तदान केले. देशाची आणि येथील जनतेची अनेकप्रकारे सेवा करण्याच्या अदाणी समुहाच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने अदाणी फाऊंडेशन हे दरवर्षी अध्यक्षांच्या वाढदिवशी ऐच्छिक रक्तदान मोहिमेचे आयोजन करते.
अदाणी फाऊंडेशनच्या रक्तदान मोहिमेमध्ये १४,००० रक्त युनिट जमा झाले. हे गेल्या वर्षी संकलन केलेल्या संख्येपेक्षा जवळपास ५,००० युनिट अधिक आहे. संपूर्ण भारतातील २० राज्यांमध्ये ११५ शहरांमध्ये विविध १५२ ठिकाणी रक्तदान केंद्रांची व्यवस्था यासाठी करण्यात आली होती. या रक्तदान मोहिमेंतर्गत १३८ हून अधिक रक्तपेढ्या कार्यरत होत्या.
अदाणी कुटुंबाने विविध सामाजिक कारणांसाठी ६०,००० कोटी रुपयांच्या दातृत्वाची घोषणा केल्यानंतर एका दिवसातच ही राष्ट्रव्यापी रक्तदान मोहीम राबविण्यात आली. अदाणी फाऊंडेशनद्वारे प्रशासित करण्यात येणारा हा निधी विशेषत: देशाच्या ग्रामीण भागात संबंधित सेवाभावी कार्यांसाठी उपयोगात आणला जाणार जाईल.
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेचा सामना करणाऱ्या रुग्णांना रक्ताशिवाय पर्याय नसतो. संकलित केलेले रक्त हे नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत सुरक्षितपणे साठवले जाते तसेच ते संरक्षितही केले जाते. गंभीर जखम, शस्त्रक्रिया प्रक्रिया, रक्त विकार, कर्करोगावरील उपचार आणि इतर अनेक वैद्यकीय निकडीच्या स्थितीत आपत्कालीन वैद्यकीय रक्तसंक्रमणासाठी रुग्णांना ते उपलब्ध करून दिले जाते.