नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७0 अनुच्छेद हटवल्यानंतर त्या राज्यातील १४४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते, असे उघड झाले आहे. ही मुले ९ ते १७ वयाची होती. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बाल या समितीनेच सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.या १४४ पैकी १४२ अल्पवयीन मुलांची आता सुटका करण्यात आली आहे आणि दोघा जणांना तेथील बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली आहे. पोलीस, तसेच तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समितीने हे न्यायालयाला कळविले आहे.कोणत्याही अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्यात आलेले वा डांबून ठेवण्यात आलेले नाही आणि बालहक्कांचे कठोर पालन करण्यात यावे, असे सर्व पोलीस ठाण्यांना कळवण्यात आले आहे, असे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले असल्याचा उल्लेखही समितीने केला आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या चारपैकी एका अल्पवयीन मुलाला सोडण्यात आले आहे.बालहक्क कार्यकर्त्यांचा होता अर्जबालहक्कासाठी काम करणाऱ्या इनाक्षी गांगुली व शांता सिन्हा यांनी काश्मीरमध्ये अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती.त्यावरील सुनावणीमध्ये न्यायालयाने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बालन्याय समितीला या प्रकरणाची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर न्या. अली मोहम्मद माग्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पोलीस व तपास यंत्रणांकडून माहिती मिळवून आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला.
काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७0 रद्द केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या १४२ अल्पवयीनांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:29 AM