वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:57 AM2024-07-31T08:57:02+5:302024-07-31T08:59:01+5:30

Wayanad Landslide : केरळमध्ये झालेल्या भूस्खलातील मृतांची संख्या वाढतच चालली असून शेकडो मृतदेह हाती लागले आहेत.

143 people have died due to Landslide in Wayanad Kerala | वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

Kerala Wayanad Landslide :केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या भूस्खलनात मोठी जीवितहानी झाली आहे.  मुसळधार पावसानंतर चार गावांमध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण अद्याप बेपत्ता आहे. झोपेत असतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहून आल्याने काही कळायच्या आत गावकरी त्याखाली गाडले आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेकजण त्यात वाहून गेले आहेत. केरळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या भयानक घटनेत मृतांचा आकडा १४७ वर पोहोचला आहे. अद्यापही बचावकार्य सुरु असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने मंगळवारी पहाटे दरडी कोसळून तब्बल १४७ जण मृत्यूमुखी पावले आहेत. शेकडो लोक अद्याप ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली प्रशासनाने दिली. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार या ठिकाणी अनेकवेळा भू्स्खलन झाले आणि ही घटना घडली.  मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी मिळाली आणि त्यांचा जीव गेला.

दुसरीकडे, भारतीय हवामान खात्याने केरळच्या सर्व उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील वीस तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील सात दिवस राज्यभर अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

१२२ इन्फंट्री बटालियन मद्रासच्या सेकंड-इन-कमांडच्या नेतृत्वाखाली ४३ जवानांची टीम बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. लष्कराचा अभियांत्रिकी गटही या भागात पोहोचला आहे. हवाई दलाचे एमआय-१७ आणि ध्रुव हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. नौदलाचे ३० डायव्हर्सही दाखल झाले आहेत. एनडीआरएफनेही बचाव कार्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, केरळमध्ये गेल्या सहा वर्षांतील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. राज्यात ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या पुरात ४८३ जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूस्खलनाची साखळी रात्री २ वाजता सुरू झाली. सकाळी सहा वाजेपर्यंत दरड कोसळण्याच्या तीन घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे चार गावांना फटका बसला आहे.

Web Title: 143 people have died due to Landslide in Wayanad Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.