शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

गुजरातच्या ४ हजार गावांत भाजपाला १४४ कलम लागू, धरण व बंदराला विरोध, आदिवासी आणि मच्छीमार आक्रमक

By संदीप प्रधान | Published: December 02, 2017 2:20 AM

पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी...

वलसाड : पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी आदिवासी पट्ट्यातील चाकमांडला या दुर्गम गावात धरणामुळे विस्थापित होणा-या ग्रामस्थांमध्ये आणि उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर उभारण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने भाजपाला विरोध आहे.चाकमांडला गाव धरमपूर विधानसभा मतदारसंघातील. या आदिवासीबहुल मतदारसंघावर वर्षानुवर्षे काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर उंबरगावमधून भाजपाचे रमण पाटकर तब्बल नववी निवडणूक लढत आहेत आणि बंदराला विरोध सुरू असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.मेहसाणा, राजकोट, सूरत व नवसारी येथील ४ हजार गावांमध्ये भाजपा उमेदवारांना व कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करणारे फलक लावण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले आहे. पाटीदार समाजाच्या या विरोधाची चर्चा सर्वदूर पसरली आणि वलसाड, सूरतसारख्या शहरी भागांतील नाराज मतदारांनी वॉर्डांमध्ये आणि सोसायट्यांमध्येही भाजपासह सर्वच पक्षांना १४४ कलम लागू केले. राजकीय पक्षाचे उमेदवार व नेत्यांनी शहरी मतदारांच्या नाकदुºया काढून काही ठिकाणी हे फलक काढून टाकायला लावले.पाटीदार समाजातील रोषाला निमित्त ठरला, तो तलाठ्यांच्या भरतीमधील दोन वर्षांपूर्वीचा घोटाळा. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ््याच्या धर्तीवर गुजरातमध्ये एक लाख रुपये घेऊन झालेली तलाठ्यांची भरती उच्च न्यायालयाने रद्द केली. तेथेच पाटीदारांच्या आंदोलनाची ठिणगी पडली. वलसाडमधील आदिवासीबहुल भागातील बोपी, वास्ता, धरमपूर व चाकमांडला गावे महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. धरणबांधणीमुळे चाकमांडला विस्थापित होण्याची भीती आदिवासींना आहे. बोपीतील आदिवासी ग्रामस्थ म्हणाले की, तिकडे जाऊन पाण्याची समस्या आहे का? धरणाची गरज आहे का? असे सवाल करू नका. लोक संतापून अंगावर धावून येतात.रस्त्यावर बॅरिकेड्सया गावांकडे जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स टाकले होते. निमलष्करी दलाचे जवान व स्थानिक पोलीस पुढे आले. कुठून आलात? या गावात का जायचे आहे? अशा असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली.ओळखपत्र निरखून पाहिले. ईश्वरलाल पटेल नावाचा पोलीस अधिकारी बॅगा तपासताना पोलीस शिपायांना दारू, कॅश, हत्यार, बॉम्ब आहे का बघा, म्हणून सूचना करीत होता, त्यामुळे मोठी गंमत वाटली.महाराष्ट्राच्या सीमेलगत ही गावे असल्याने दारू, पैसे, शस्त्रे गुजरातमध्ये येऊ शकतात. त्यामुळे आम्ही सतर्क असल्याचे या पोलीस अधिकाºयाने सांगितले.उंबरगाव तालुक्यातील नारगोळमध्ये बंदर प्रकल्पाला तेथील मच्छीमारांचा विरोध आहे. हे बंदर उभे राहणार, हे निश्चित. मात्र, त्यामुळे उंबरगावमधील भाजपाचे उमेदवार रमण पाटकर यांची डोकेदुखी वाढली आहे. पाटकर यांनी आतापर्यंत आठ निवडणुका लढविल्या असून, ही त्यांची नववी निवडणूक आहे. त्यापैकी चार निवडणुकात ते विजयी झाले. जनता दलापासून वेगवेगळ््या पक्षांद्वारे त्यांनी निवडणूक लढविली होती.धरणाचा अट्टाहास कशाला? : चाकमांडला गावाला भेट दिली, तेव्हा लोकांमध्ये धरणाबाबत कमालीची भीती असल्याचे जाणवले. जमिनीत व नदीला पुरेसे पाणी असताना धरणाचा अट्टाहास कशाला, असा सवाल आदिवासींनी केला. धरमपूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील खडकाळ रस्त्यावर ही गावे आहेत. घनदाट झाडी आणि कच्चा रस्ता पक्का करण्याची सुरू असलेली कामे हेच दृश्य दिसते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातBJPभाजपा