शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

राजनाथसिंग, जेटली आणि व्यंकय्या ठरवणार देशाचा 14वा राष्ट्रपती

By admin | Published: June 12, 2017 7:27 PM

राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्य समिती नियुक्त केली

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 12 - विविध राजकीय पक्षांशी चर्चा करून राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक सर्वसंमतीने व्हावी या प्रयत्नासाठी, तसेच सत्ताधारी आघाडीचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्य समिती नियुक्त केली आहे. लहान मोठ्या तमाम राजकीय पक्षांशी चर्चा आणि विचारविनिमय करून शक्यतो सर्वसंमतीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.राजधानी दिल्लीतल्या विद्यमान राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वाधिक महत्त्वाची असल्याने या काळात अमित शाह यांचे वास्तव्य दिल्लीत असणे अत्यावश्यक आहे. साहजिकच सोमवारपासून सुरू होणारा आपला उत्तराखंडाचा दौरा शाह यांनी रद्द केला आहे. आंध्र प्रदेशात 15 व 16 जुलै रोजी होऊ घातलेली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही पुढे ढकलण्यात येते आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान 17 जुलै रोजी आणि मतमोजणी 20 जुलै रोजी आहे. त्यामुळे साऱ्याच राजकीय नेत्यांचे जून आणि जुलैतल्या कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे.काँग्रेस, डावे पक्ष, जद(यु), राजदसह बहुतांश विरोधी पक्षांच्या दिल्लीतल्या सध्याच्या हालचाली लक्षात घेता, विरोधकांतर्फे एक सर्वमान्य उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. साहजिकच यंदाही निवडणूक अटळ दिसते आहे. अशा वातावरणात सत्ताधारी पक्षाच्या त्रिसदस्य समितीने सर्वपक्षीय संमती व सामंजस्यासाठी चालवलेले प्रयत्न केवळ उपचारापुरता राजकीय शिष्टाचार ठरणार आहे. प्रस्तुत निवडणुकीसाठी 14 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. जून अखेरपर्यंत उमेदवार ठरणार असल्याने महिनाभरातल्या घडामोडींमध्ये देशाचा 14वा राष्ट्रपती नेमका कोण? याबाबतची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे.