केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 10:57 AM2019-05-26T10:57:57+5:302019-05-26T11:01:43+5:30

आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे.

15 ISIS terrorists may inter in Kerala, security forces alert | केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

googlenewsNext

तिरुवनंतपुरम - श्रीलंकेमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून शेकडो बळी घेतले होते. ही घटना ताजी असतानाचा आता आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. सुमारे 15 दहशतवादी नौकेत स्वार होऊन लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

पोलीस खात्यामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत असे अलर्ट नेहमीच येत असतात. मात्र यावेळी दहशतवाद्यांची नेमकी संख्याही सांगण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच किनारपट्टी भागात बंदोबस्त वाढवल आहे. 21 एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दक्षिण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र श्रीलंकेतून आलेल्या या अलर्टनंतर 23 मेपासून सुरक्षा व्यवस्थेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, केरळमध्ये अद्यापही आयएसच्या समर्थकांचे अस्तित्व असल्याचा गुप्तहेर यंत्रणांना संशय आहे. इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आयएसचा या दोन्ही देशांमधून सफाया करण्यात आला आहे. मात्र आता दक्षिणा आशियामध्ये पाळेमुळे पसरवण्यासाठी आयएसकडून प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: 15 ISIS terrorists may inter in Kerala, security forces alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.