जयपूर: राजस्थानमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष सुरूच आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. याशिवाय काँग्रेस विरुद्ध राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यातही वाद पेटला आहे. यानंतर आता सचिन पायलट यांचा गट पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसत आहे. गेहलोत गटाचे १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा पायलट गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सचिन पायलट गटात असलेले काँग्रेसचे वरिष्ठ आमदार हेमाराम चौधनी यांच्या दाव्यानं सध्या खळबळ माजली आहे. गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा पायलट गटाकडून करण्यात आला आहे. त्याआधी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांच्यासोबत असलेले ३ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. हे आमदार लवकरच आमच्यासोबत येतील, असंही सुरजेवाला म्हणाले.
राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोतांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 8:42 PM