लखनऊ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकळ घातला आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातच अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (AMU)आणखी एका प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विद्यापीठातील लॉ फॅकल्टीचे डीन प्राध्यापक डॉ. मोहम्मद शकील अहमद समदानी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन आठवड्यातच कोरोनामुळे अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील 15 प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी मिळून विद्यापीठातील एकूण 40 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. (15 professors have lost their lives in 2 week aligarh muslim university, covid deaths)
यूपीच्या जौनपूरचे राहणारे शकील समदानी यांनी यूपी बोर्डातून इयत्ता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण केल्यानंतर गोरखपूर विद्यापीठातून बीए केले होते. त्यानंतर त्यांनी अलिगढ विद्यापीठातूनही एलएलबी, एलएलएम आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले होते. रोज कोणत्या ना कोणत्या विद्यमान किंवा निवृत्त प्राध्यापकाच्या निधनावर विद्यापीठ प्रशासनाला शोक व्यक्त करावा लागत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या या महामारीत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती प्रा. तारीक मंसूर यांचेही निधन झाले आहे. विद्यापीठीतील संस्कृत विभागाचे माजी चेअरमन प्रा. खालिद बिन यूसूफ यांचेही काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले. खालिद यांनी ऋग्वेदात पीएचडी केली होती. इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची कन्या इला आणि इब्रा यांनी भाग घेतला होता. पत्नीला व्हॉट्सअॅपवरून तलाक दिल्यामुळेही ते वादग्रस्त ठरले होते.
(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)
कोरोना काळात या प्राध्यापकांचा मृत्यू झाला...विद्यापीठ शिक्षक संघटनेचे माजी सचिव व ईसी सदस्य प्रा. आफताब आलम यांनी जगाचा निरोप घेतलेल्या शिक्षकांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये एएमयूच्या लॉ फॅकल्टीचे डीन प्रा. शकील समदानी, माजी प्राध्यापक जमशेद सिद्दीकी, सुन्नी धर्मशास्त्र विभागाचे प्रा. एहसानउल्लाह फहद, उर्दू विभागाचे प्रा. मौलाना बख्स अन्सारी, पोस्ट हार्वेस्टिंग अभियांत्रिकी विभागाचे प्रा. मो. अली खान, राज्यशास्त्र विभागाचे प्रा काझी, मोहम्मद जमशेद, मोलीजात विभाग अध्यक्ष प्रा. मो. युनूस सिद्दीकी, इलमुल अदविया विभागाचे अध्यक्ष गुफराम अहमद, मानसशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. साजिद अली खान, संगीतशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान, सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजचे डॉ.अजीज फैसल, विद्यापीठ पॉलिटेक्निकचे मोहम्मद सैयदुज्जमान, इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक जिबरैल, संस्कृत विभागाचे माजी अध्यक्ष प्रा. खलिद बिन युसूफ, इंग्रजी विभागाचे डॉ. मोहम्मद यूसुफ अन्सारी यांचा समावेश आहे.
("योग्य कोण, पंतप्रधान की तुम्ही?", जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल)
देशात आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.