राजकीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून १५ हजार कोटी मिळाले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:22 PM2022-08-26T23:22:07+5:302022-08-26T23:22:35+5:30

काँग्रेस पक्ष या अहवालात आघाडीवर आहे कारण त्यांना २०२० ते २०२१ या काळात अज्ञात सोर्सकडून १७८.७८ कोटी रुपये मिळाले

15 thousand crores received by political parties from unknown sources; report of ADR | राजकीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून १५ हजार कोटी मिळाले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

राजकीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून १५ हजार कोटी मिळाले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

Next

नवी दिल्ली - देशात राष्ट्रीय पक्षांना देणग्या कुठून मिळतात, किती मिळतात, कोण देते, हा सगळा वाद कायमच राहिला आहे. कारण त्यात पारदर्शकताही कमी होती, त्यामुळे अधिक प्रश्न उपस्थित झाले. आता या प्रश्नांमध्ये ADR चा अहवाल समोर आला आहे. राष्ट्रीय पक्षांना अज्ञात स्त्रोतांकडून १५,०७७ कोटी रुपये मिळाल्याचा दावा त्या अहवालात करण्यात आला आहे. हे पैसे कुठून आले? ज्याची कोणतीही नोंद सापडत नाही. यात काँग्रेस आघाडीवर आहे, ज्यांना अज्ञात स्त्रोत म्हणून १७८.८७ कोटी रुपये मिळाले आहेत.

अज्ञात सोर्सकडून १५,०७७.९७ कोटी
अहवालानुसार, २००४ ते २००५ आणि २०२० ते २०२१ दरम्यान, राष्ट्रीय पक्षांना अज्ञात सोर्सकडून स्त्रोतांकडून १५०७७.९७ कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे, केवळ २०२०-२१ हा आकडा ६९०.६७ कोटींपर्यंत जातो. ADR ने या अहवालात एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आणि २७ प्रादेशिक पक्षांचा समावेश केला आहे. अशा स्थितीत एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे, ज्याची आकडेवारी आश्चर्यकारक आहे. २०२० ते २०२१ दरम्यान देशातील आठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न ४२६.७४ कोटी अज्ञात सोर्सकडून आले आहे, तर प्रादेशिक पक्षांबद्दल बोलायचे तर हा आकडा २६३.९२ कोटी इतका नोंदवला गेला आहे.

काँग्रेसचे सर्वाधिक उत्पन्न
काँग्रेस पक्ष या अहवालात आघाडीवर आहे कारण त्यांना २०२० ते २०२१ या काळात अज्ञात सोर्सकडून १७८.७८ कोटी रुपये मिळाले आहेत, जे एकूण उत्पन्नाच्या ४१.८९ टक्के आहे. भाजपबद्दल बोलायचे झाले तर अज्ञात सोर्सनं १००.५० कोटी रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांमध्ये YSR काँग्रेस (९६.२५ कोटी), DMK रु. ८०.०२ कोटी, BJD रु. ६७ कोटी, मनसे रु. ५.७७ कोटी, आप रु. ५.४ कोटी आहेत.

कोणत्या पक्षांच्या ऑडिटमध्ये घोळ?
ADR ने आपल्या अहवालात ही माहिती देखील दिली आहे की, २००४-०५ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये कूपनच्या विक्रीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उत्पन्न ४.२६१.८३ कोटी रुपये आहे. आता हे आकडे पडताळले जाऊ शकतात, परंतु ADR नुसार, असे सात पक्ष आहेत ज्यांच्या लेखापरीक्षण आणि योगदान अहवालात तफावत आढळून आली आहे, या यादीत आम आदमी पार्टी, CPI, KC-M सारख्या पक्षांचा समावेश आहे.

 

Web Title: 15 thousand crores received by political parties from unknown sources; report of ADR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.