शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी लष्कर वापरणार 15 वर्षापूर्वीची रणनीती

By admin | Published: May 12, 2017 1:06 PM

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यांच्या कुरापती रोखण्यासाठी भारतीय भारत लष्कर आक्रमक धोरण स्वीकारणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि, 12 - सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यांच्या कुरापती रोखण्यासाठी भारतीय भारत लष्कर आक्रमक धोरण स्वीकारणार आहे. 15 वर्षापूर्वी बंद करण्यात आलेलं कासो ऑपरेशन भारतीय लषकर पुन्हा अमलात आणणार आहे. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि सोपियान येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल.

सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू झालेले आणि काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनलेले तरुण लेफ्टनंट उमर फय्याज (22) यांची दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. त्यामुळे लष्कराने कासो ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय सुरक्षा दलाने गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये 4000 सैनिकांच्या मदतीने अभियान चालवले होते. यावरुनच भारतीय लष्कराच्या नव्या रणनीतीचे संकेत मिळत आहेत. दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद केल्यानंतर भारतीय लष्कारांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 महिन्यांत आठ जण ठार तर 17 जण जखमी झाले आहेत.काय आहे कासो ऑपरेशन -  लष्कराने 15 वर्षांपूर्वी स्थानिकांच्या विरोधानंतर कासो ऑपरेशन बंद केले होते. 2001 नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली होती. कासो म्हणजे, घेराव घालणे आणि शोध मोहीम होय. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन असेही कासो ऑपरेशनला म्हटले जाते. दहशतवादांच्या कुरापती - 2016 या कॅलेंडर वर्षात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी यात 2015 वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. गृहमंत्रालयाच्या 2016-17 वर्षाच्या वार्षिक अहवालात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी कमी झाली होती; परंतु ती फार मोठ्या प्रमाणावर 2016 मध्ये वाढली आहे. 2016 मध्ये 322 दहशतवादी हल्ले झाले होते, तर 2015मध्ये ते 208 होते. 2016 मध्ये सुरक्षा दलांचे कर्मचारी ठार मारले जाण्याचे प्रमाणही वाढले आहे.