नवी दिल्ली, दि. 23 - देशाचा नियोजनबद्धरित्या आणि वेगाने विकास घडवून आणण्यासाठी 15 वर्षांचा रोडमॅप आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत सादर करण्यात आला. नीती आयोगाच्या कार्यकारी समितीची बैठक आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी, नीती आयोगाचे सदस्य आणि विशेष निमंत्रित पाहुणे उपस्थिती होते. मात्र या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहिले. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया बैठकीस उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 15 वर्षांच्या रोडमॅप सादर झाला. यात पुढील सात वर्षांसाठीचे रणनीतीक दस्तऐवज आणि तीन वर्षांचा अॅक्शन प्लॅन समाविष्ट आहे. नव्या भारताचे स्वप्न तेव्हाच साकार होईल जेव्हा राज्य सरकारे आणि त्यांचे मुख्यमंत्री मिळून प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
राज्यही आता नीती ठरवण्याच्या प्रक्रियेचा भाग बनतील असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वावर बोलताना मोदी म्हणाले. केंद्रीय योजना, स्वच्छ भारत, कौशल्य विकास आणि डिजिटल पेमेंट आदी विषयांबाबत धोरण ठरवताना मुख्यमंत्र्यांचे मत विचाराचा घेतले जाईल." देशात बदल घडवून आणण्यासाठी नीती आयोग नव्या जोशासह काम करत आहे असेही पंतप्रधानांनी सांगितले.
Prime Minister Modi at NITI Aayog meet called for carrying forward the debate and discussion on simultaneous elections.— ANI (@ANI_news) April 23, 2017