शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

CoronaVirus : अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरूच, एकाच दिवसात 1514 जणांचा मृत्यू; इटलीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:47 PM

संपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर जगातील मृतांचा आकडा 1 लाखहून अधिक आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पार हतबल करून टाकले आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या 5 लाख हून अधिक आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत.

ठळक मुद्देअमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाने तब्बल 1514 जणांचा बळी घेतलाअमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा आता 22 हजारवरसंपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत

वॉशिंग्टण : संपूर्ण जगात हाहाकार घातलेल्या कोरोनाने अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. गेल्या एक दिवसात येथे कोरोनाने तब्बल 1514 जणांचा बळी घेतला. या बळींबरोरच अमेरिकेतील एकूण मृतांचा आकडा आता 22 हजारवर पोहोचला आहे. मृतांच्या बाबतीत अमेरिकेने इटलीलाही मागे टाकले आहे. कोरोनामुळे इटलीत आतापर्यंत 19,899 जणांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण जगात कोरोनामुळे 18 लाखहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर जगातील मृतांचा आकडा 1 लाखहून अधिक आहे. कोरोनाने महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला पार हतबल करून टाकले आहे. येथे कोरोना बाधितांची संख्या 5 लाख हून अधिक आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेतच झाले आहेत.

अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. येथील रुग्णांचा आकडा आता 1 लाख 66 हजारवर गेला आहे. इटलीत 1 लाख  56 हजार तर फ्रान्समध्ये 1 लाख 32 हजार कोरोना रुग्ण आहेत. स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाली असली तरी येथे सोमवारीही 517 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत तेथे 17,500 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आता अर्थव्यवस्थेशी संबंधित काही क्षेत्रांतील कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. तेथे काही क्षेत्रांतील लोक पुन्हा कामावर जाऊ लागले आहेत. 

इंग्लंडमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांवरइंग्लंडमध्ये कोरोना बाधितांची संख्या 84 हजारवर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 14 हजारहून अधिक, तर जर्मनीत 3 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत केवळ दोन जणांचा मृत्यू -जेथून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली त्या चीनमध्ये कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी अटकाव घातला गेला आहे. तेथे गेल्या 24 तासांत केवळ दोन जणांचा मृत्यू झाला. मात्र तेथील मृतांची संख्या 3 हजार 350पर्यंत पोहोचली आहे. इराणमध्येही कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीतून दिसते. अर्थात तिथेही मृत्यूंचा आकडा जवळपास 5 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. म्हणजेच जगात आतापर्यंत झालेल्या मृत्युंपैकी सुमारे 80 हजार मृत्यू याच सात देशांमध्ये झाले आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

भारतात एकूण 20 टक्के रुग्ण गंभीर आहेत -भारतात रुग्णसंख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालये सज्ज असून अशा रुग्णांच्या तुलनेत बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरची संख्या खूप जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. सद्य:स्थितीत एकूण 20 टक्के रुग्ण गंभीर आहेत. अशांची संख्या 1 हजार 671 आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. एकूण 716 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाItalyइटलीdoctorडॉक्टर