सिक्किममध्ये लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी एक बस दरीड कोसळली, या अपघातात 16 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.
माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. 4 जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. 'उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना झालेल्या प्राणहानीमुळे खूप दुःख झाले आहे. त्यांच्या सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांचे मनापासून आभार मानतो. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना, असं राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.