रूजू न झालेले १६ शिक्षक रडारवर
By admin | Published: July 05, 2016 12:28 AM
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून काही दिवसांपूर्वी जिल्ात रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात १६ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्ती दिलेल्या शिक्षकांपैकी अजून एकही शिक्षक रूजू झालेला नाही. हे शिक्षक रूजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी म्हटले आहे.
जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून काही दिवसांपूर्वी जिल्ात रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात १६ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नियुक्ती दिलेल्या शिक्षकांपैकी अजून एकही शिक्षक रूजू झालेला नाही. हे शिक्षक रूजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी म्हटले आहे. आंतरजिल्हा प्रक्रियेतून परजिल्ातून जळगाव जि.प.अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती करताना संबंधित शिक्षकांना मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यात रिक्त असलेल्या जागांवर नियुक्ती करण्याची पूर्वसूचना दिली होती. असे असतानाही संबंधित शिक्षक आता सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या मागत आहेत. यामुळे ते नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होत नाहीत. आता शाळा सुरू झाल्या. परंतु शिक्षक रूजू झालेले नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालक आणि संबंधित ग्रा.पं.चे पदाधिकारीदेखील करीत आहेत. याबाबतच्या तक्रारी सभापती यांच्याकडेही आल्या. धनके यांनी याचा आढावा शिक्षण विभागासोबत बैठक घेऊन घेतला. त्यात १६ शिक्षक रूजू होत नसल्याची बाब समोर आली. गाडेकर कार्यमुक्तप्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी यांची नंदुरबार येथे याच पदावर बदली झाली. त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांचा कार्यभार विस्तार अधिकारी खलील शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.