जळगाव: जिल्ातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काही राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले आहे. या कामांचा शुभारंभ २५ जानेवारी रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे व ए.टी.पाटील यांनी रविवारी दिली.सागर पार्कवर होणार सभाभाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व सरचिटणीस दीपक फालक आदी उपस्थित होते. या कामांच्या शुभारंभांसाठी सागर पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरपहूर, बोदवड, मुक्ताईनगर, बर्हाणपूर, अंकलेश्वर, सिल्लोड, औरंगाबाद आदी राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे.शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूलया निधीतूनच जळगाव शहरातून जाणार्या रस्त्यावर बांभोरी ते नशिराबाद नाक्यापर्यंत १७ कि.मी.च्या अंतरात तीन उड्डाणपुल उभारण्यात येणारआहेत. कालिंका माता ते अजिंठा चौक, इच्छादेवी ते आकाशवाणी चौक व बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी हे उड्डाणपुल असतील. त्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत,अशी माहिती खासदारांनी दिली.
भुसावळला प्लॉस्टिक पार्कजिल्ातील प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भुसावळला एमआयडीसीत प्लॉस्टिक पार्कचाही प्रस्ताव आहे. हे काम अंतिम टप्यात आले आहे. केंद्र सरकारने देशात अहमदाबाद, वाराणसी व जळगाव अशी तीन जिल्ांची निवड केली आहे. टेक्सटाईल्स पार्क हा जामनेर तालुक्यातच होणार असल्याचा पुनरुच्चार खासदारांनी केला.असा आहे मार्ग व निधीपहूर, जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर,बर्हाणपूर या ७५ कि.मी.रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये, नांदुरा-बर्हाणपूर या महाराष्ट्र सिमेला जोडणार्या १४५ कि.मी.च्या रस्त्यासाठी १४५० कोटी, इंदूर, बर्हाणपूर, पिंप्री, मुक्ताईनगर या ४०१ कि.मी.साठी ३२६० कोटी, बोदवड, जामनेर, पहुर, अजिंठा, सिल्लोड, औरंगाबाद ४०१ कि.मी.च्या मार्गासाठी ३२६० कोटी, औरंगाबाद, फुलंब्री,जळगाव या १५५ कि.मी.साठी ४००० कोटी,बर्हाणपूर, रावेर,चोपडा, शिरपूर, सावदा, नंदुरबार, देडीपाडा, अंकलेश्वर या ५५५ कि.मी.साठी ४३५० यासह राष्ट्रीय महागार्ग २११ औरंगाबाद, चाळीसगाव ,धुळे या १५३ कि.मी.साठी २१७६ कोटी, चाळीसगाव घाटात १४ कि.मी. रस्ते व रेल्वेचा संयुक्त प्रकल्पासाठी १७५० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचीमाहितीखासदारांनीदिली.