हैदराबाद, दि. 17 - पैशांसाठी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे ओमानवरुन आलेल्या 65 वर्षीय शेखसोबत लग्न लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. नवाब साहेब कुंटा येथे राहणारी मुलीची आई सईदा उन्निसाने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, मुलीला मस्कतवरुन परत आणण्याची मागणी केली आहे.
उन्निसाने तिच्या तक्रारीत नव-याची बहिण घोसिया आणि नवरा सिकंदरवर आरोप केला आहे. या दोघांनी आपल्या मुलीला लग्नाला भाग पाडले असे तिचा आरोप आहे. हा शेख रमझानच्या आधी हैदराबादला आला होता. मुलीचे शेख बरोबर लग्न लावून द्यायला माझा विरोध होता पण नव-याने काझीच्या मदतीने हॉटेलमध्ये मुलीचे लग्न लावले असे उन्निसाने सांगितले. मी जेव्हा विरोध केला तेव्हा शेखने मला मुलीला 5 लाख रुपयांना विकत घेतले असून सर्व रक्कम सिंकदरला दिल्याचे सांगितले. सर्व रक्कम परत केली तरच, शेख मुलीला भारतात पाठवायला तयार आहे असे उन्निसा म्हणाली.
मुलीला लग्नाला तयार करण्यासाठी सिकंदरने तिला ओमानमधले ऐषोआरामी लाईफस्टाईलचे व्हिडीओ दाखवले. शेख बरोबर लग्न केल्यास आरामदायी आयुष्य वाटयाला येईल असे स्वप्न दाखवल्यामुळे मुलगी लग्नाला तयार झाली असावी असे उन्निसाने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर या शेखने नववधूसोबत चार दिवस हैदराबादमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला केला.
आणखी वाचा श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम'त्या' 10 दिवसाच्या बाळाला स्वतः आईनेच फेकलं नदीत
त्यानंतर मुलगी तीगलकुंटा येथील सिकंदरच्या घरी गेली तर, शेख ओमानला निघून गेला. मुलीला परत आणण्यासाठी मी अऩेकदार सिकंदरच्या घरी गेले पण त्याने मला धमकावून परत पाठवले. मुलगी सिकंदरकडे असताना त्याने मुलीला ओमानला पाठवण्यासाठी पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रांची जमवाजमव केली आणि मुलीला ओमानला पाठवले. आरोपींवर गुन्हा दाखल करुन मुलीला मायदेशी परत आणावे अशी मागणी उन्निसाने केली आहे.
पैशांच्या लोभामुळे मुलीला विकणारे पालक भारतातच नाही तर, परदेशातही आहेत. मागच्यावर्षी चीनमध्ये आयफोन विकत घेण्यासाठी आपल्या 18 दिवसाच्या मुलीला ऑनलाइन विकल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली त्यानंतर त्याला 3 वर्षाच्या कारागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली.