मलप्पुरम (केरळ) : स्थानिक लोकांना त्रास होऊ नये आणि ध्वनिप्रदूषणही कमी व्हावे यासाठी मलप्पुरम जिल्ह्यातील वझक्कड शहर आणि त्याच्या परिसरात असलेल्या एकूण १७ मशिदींनी पाच नमाजांच्या वेळी लाऊडस्पीकरवरून स्वतंत्र अजान न देता दिवसातून फक्त एकदाच सामायिक अजान देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. सुन्नी, मुजाहिद (सलाफी), जमाते इस्लामी व तब्लिगे जमात इत्यादी मुस्लिमांमधील विविध शाखांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत यासंबंधी रीतसर समझोता करण्यात आला व गेला आठवडाभर त्याचे पालन सुरू आहे. त्यानुसार वलिया जुम्मा मशीद या सर्वांत मोठ्या मशिदीतून दिवसातील एकाच प्रमुख नमाजाची अजान लाऊडस्पीकरवरून देण्यात येते व इतर मशिदी त्याच वेळी त्याच अजानचा लाऊडस्पीकर न लावता पुनरुच्चार करतात. त्यामुळे सुमारे ५ किमी परिसरात १७ मशिदी असूनही दिवसातून फक्त एकच अजान सर्वांना ऐकू जाईल अशी मोठ्या आवाजात दिली जाते, असे वझक्कड मशिद समितीचे अध्यक्ष टी. पी. अब्दुल अझीज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
१७ मशिदींमधून सामायिक अजान!
By admin | Published: June 16, 2017 3:43 AM