१७... नांदागोमुख
By admin | Published: December 18, 2014 12:40 AM
नांदागोमुख येथे धार्मिक कार्यक्रम
नांदागोमुख येथे धार्मिक कार्यक्रमनागपूर : सावनेर तालुक्यातील नांदागोमुख येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात मंदिरावर नवीन कळसही चढविण्यात आला.मोक्षदा एकादशीनिमित्त नवीन कळस चढविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नारायण भोयर यांच्या हस्ते नवीन कळसाची पूजा करण्यात आली. बुधवारी सकाळी ८ वाजता सुधाकर शेडामे यांच्या घरून कळसाची मिरवणूक काढण्यात आली. यात नवयुवक माताखेडी मंडळ, दिंडी पथकासह स्थानिक व परिसरातील भाविक सहभागी झाले होते. सकाळी ९ वाजता ही मिरवणूक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसरात पोहोचली.त्यानंतर विधिवत पूजा करून नवीन कळस मंदिरावर चढविण्यात आला. सकाळी १० वाजता आरती आणि हरिपाठ पार पडला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वितेसाठी मनोहर मोवाडे, जगदीश जीवतोडे, कृष्णा मोवाडे, केशव सातफळे, देवेंद्र चांदेकर, विष्णू शेडामे, मनोहर शेडामे, दिवाकर मोवाडे, निळकंठ सातपुते, गुलाब बाळापुरे, वसंत िकिनारकर, चंदू वंजारी, नामदेव कोसरकर, मोहन दरेकर, नारायण बोबडे, मारोती मिलमिले, उद्धव वंजारी, मंगेश बावनकर, सरनाईक, भोजराज पारधी, जयश्री मोवाडे, झिबला मिलमिले, सत्यभामा वडस्कर, उषा खोंडे, इंदिरा मोवाडे, वैशाली धांडे, अंजना कष्टी, अल्का मोवाडे यांच्यासह स्थानिक भाविकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)***