ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 2- ओडिशामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वीज दुर्घटनेत 9 जण जखमी झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. मुसळधार पावसानं ही वीज कोसळल्याची माहिती समोर येते आहे.
या वीज दुर्घटनेत जवळपास 21 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या मुसळधार पावसानं दक्षिणी आणि सागरी भाग प्रभावित झाला असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक दुर्घटना झाल्या आहेत. केंद्रपाडा, भद्रक, गंजम, खुर्दा आणि मयूरभंज जिल्ह्यात पावसानं अधिक नुकसान झालं आहे. महिन्याभरात वीज पडून 25 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
1 मे रोजी 8 माणसे वेगवेगळ्या वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. विशेष मदत आयुक्तांच्या माहितीनुसार 2016मध्ये वीज दुर्घटनेत 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात मान्सून 5 जूनला दाखल होणार असून, 6 ते 7 जूननंतर सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.