एमबीबीएसला प्रवेश मिळावा म्हणून काही विद्यार्थ्यांनी धर्म बदलल्याचा प्रकार समोर आला. चौकशीअंती विद्यार्थ्यांनी सादर केलेली जात प्रमाणपणे बोगस असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने ८ जणांचा प्रवेश रद्द केला. सुभारती विद्यापीठात हा प्रकार घडला आहे.
एमबीबीएस प्रवेशासाठी धर्मांतर, काय घडले?
आरक्षित कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळवण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी धर्म बदलाची बोगसगिरी केली. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सुभारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालया बौद्ध, अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत येते.
पहिल्या टप्प्यातील प्रवेशातील २२ जागा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. १७ विद्यार्थ्यांनी बौद्ध धर्माचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून एमबीबीएसला प्रवेश मिळवला. उत्तर प्रदेश नीट यूजी २०२४ च्या समुपदेशावेळी हा प्रकार समोर आला.
या प्रकरणात तक्रार करण्यात आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ते बोगस असल्याचे समोर आले.
१७ पैकी ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला, तर ९ विद्यार्थ्यांनी जागा सोडल्या. दरम्यान, या प्रकारानंतर राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात राखीव प्रवर्गासाठीच्या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या जातप्रमापत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
बोगस जात प्रमाणपत्र आढळल्यास प्रवेश रद्द
वैद्यकीय शिक्षण विभागाचे महासंचालक किंजल सिंह यांनी सांगितले की, चौकशीनंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळून येईल, त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईही केली जाईल.