तेलंगणाः कर्करोग(ब्लड कॅन्सर) म्हणजे मृत्यूची चाहूल ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. हा रोग जीवघेणा असल्यानं त्याची लक्षण आढळल्यास भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली. तेलंगणातल्या राचाकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या 17 वर्षीय मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवलं असून, तिचं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 17 वर्षीय रम्या सांगते, मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे अत्यानंद झाला आहे. रम्या 12वीत सायन्स शाखेत शिकत आहे. रम्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली आणि तिनं अधिकाऱ्यांना आदेश दिले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचं पालन केलं. मी आज फार खूश आहे. भविष्यात तिला पोलीस अधिकारी बनून परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे.
ब्लड कॅन्सरशी लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 8:37 AM