गोमा : ज्वालामुखीच्या भयंकर उद्रेकामुळे कांगोमध्ये भीषण संकट आले आहे. ज्वालामुखीतून निघणारा तप्त लाव्हा ज्वालामुखीजवळच्या गावांमध्ये पसरला होता. परिणामी हजारो कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. याचा लहान मुलांना मोठा फटका बसला असून सुमारे १७० मुले बेपत्ता असल्याची मााहिती सूत्रांनी दिली आहे.ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रवांडा आणि गोमा या शहरांच्या सीमेपर्यंत लाव्हा पसरला होता. सुमारे ५ हजार नागरिकांनी या शहरांमध्ये आसरा घेतला होता. तर सेक शहरातून सुमारे २५ हजार जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली. लाव्हा बाहेर पडणे थांबल्यानंतर हळूहळू कुटुंबे परतत आहेत. मात्र, अनेक लहान मुलांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. गोमा शहरातील विमानतळाजवळ अनेक मुले बेघर झालेली आढळली आहेत. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार १७० मुले बेपत्ता झालेली आहेत, तर सुमारे १५० मुले कुटुंबांपासून दुरावली गेलेली आहेत. या मुलांसाठी दोन संक्रमण शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे.नागरिक परतण्यास सुरुवात झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कॉलरासारख्या आजारांची साथ पसरू नये, यासाठी नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. लहान मुलांना मोठा फटका बसला असून सुमारे १७० मुले बेपत्ता असल्याची मााहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच औषधे आणि इतर साहित्याचेही नागरिकांना वितरण करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कांगोमध्ये १७० मुले बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:37 AM