जिल्ाातील ७६२ पैकी १७८ पतसंस्था अडचणीत कर्जवसुलीचे आव्हान : दोन लाख २८ हजार ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी पायपीट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2015 12:08 AM
जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.
जळगाव : सहकार कायद्याचे उल्लंघन, बेकायदेशीर कर्जवाटप, क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप या कारणांमुळे जळगाव जिल्ातील सहकार क्षेत्र हे कोलमडले आहे. सध्या जळगाव जिल्ातील ७६२ सहकारी संस्थांपैकी तब्बल १७८ पतसंस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांची हक्काच्या रकमेसाठी फरफट सुरूच आहे.९ तालुक्यातील १७८ पतसंस्थाजिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिल्हाभरातील ७६२ पतसंस्था आहेत. त्यात ६० जिल्हास्तरीय तर ६९४ तालुकास्तरीय पतसंस्था कार्यरत आहेत. यासह सहा राज्यस्तरीय व दोन विभागस्तरीय पतसंस्था आहेत. पतसंस्थामधील गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार, तसेच कामकाजातील अनियमितता या कारणांमुळे जुलै २००७ पासून राज्यभरात पतसंस्थांची आर्थिकस्थिती कोलमडली. राज्यभरातील ४६९ पतसंस्थापैकी जळगाव जिल्ातील ४२ पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. या पतसंस्थांमधील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्याने त्याचा परिणाम हा अन्य सहकारी पतसंस्थांवर पडला. त्यामुळे नव्याने अडचणीत आलेल्या १३६ पतसंस्थांसह एकूण अडचणीतील पतसंस्थांचा आकडा १७८ पर्यंत येऊन पोहचला.जिल्हाभरात ६ लाख ठेवीदारसहकार विभागाकडील नोंदीनुसार जिल्ातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांमध्ये सहा लाख १४ हजार ७ ठेवीदारांच्या ११२५.९७ कोटी रुपये रकमेच्या ठेवी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन लाख ८५ हजार २७८ ठेवीदारांना ५९८.७६ कोटी रकमेच्या ठेवी रोखीने तसेच मॅचिंग स्वरुपातील व्यवहाराने परत करण्यात आल्या आहेत.तालुकास्तरीय समितीमार्फत वाटपअडचणीतील पतसंस्थांमधील ठेवीदारांना ठेवीचे पारदर्शकपणे व प्राधान्याने वाटप करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकार्यांनी २८ ऑक्टोबर २०१० रोजी जिल्हास्तरीय कृती समितीला साहाय्यभूत अशा तालुकास्तरीय कृती समित्यांची जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, पारोळा, अमळनेर या सात तालुक्यांमध्ये निर्मिती केली. सन २०१३ पासून तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून सात हजार ६९१ ठेवीदारांना ३४.२० कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून वाटप करण्यात आली आहे.जिल्हाभरात ९३ हजार कर्जदारजिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे अडचणीतील पतसंस्थांमधील कर्जदारांची यादी मागविण्यात आली. त्यात या पतसंस्थांमधील ९२ हजार ९११ कर्जदारांकडे तब्बल १०६९.३५ कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. त्यापैकी ४६ हजार ८७८ कर्जदारांकडील रक्कम ६०५.४० कोटी रकमेचे कर्ज वसूल करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीला ४४ हजार ५७१ कर्जदारांकडे ५३१.७३ कोटी रुपयांचे कर्ज वसुली बाकी आहे.