नितीन अग्रवाल ल्ल नवी दिल्लीसर्व प्रकारचे प्रयत्न केल्यानंतरही सरकारला वायुप्रदूषणाला आळा घालण्यात अपयश आले आहे. महानगरानंतर आता मध्यम आणि छोट्या शहरांमध्येही या वायुप्रदूषणाचा कहर वाढत चालला आहे. बहुतांश शहरांमधील हवा मापदंडापेक्षा अधिक प्रदूषित असल्याची कबुली केंद्र सरकारने दिली आहे. वायुप्रदूषणाचा स्तर वाढलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरसह १८ शहरांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, चंद्रपूर, अमरावती, अकोला, डोंबिवली/अंबरनाथ, जळगाव, बदलापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, पुणे, लातूर, जालना, नागदा, नासिक, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि ठाणे या शहरांमधील वायुप्रदूषण मापदंडापेक्षा कितीतरी अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.जावडेकर म्हणाले, २०१२ मध्ये देशभरातील १७५ शहरांमधून गोळा करण्यात आलेल्या वायुप्रदूषणाच्या आकडेवारीनुसार, १२५ शहरांमध्ये १० मायक्रॉनपेक्षाही लहान वायुकणांचे प्रमाण (पर्टिक्युलेट मायक्रॉन - पीएम) मापदंडापेक्षा जास्त आहे. १२५ पैकी १२ शहरांमध्ये नायट्रोजन आॅक्साईड (एनओ) आणि एका शहरांत सल्फर डायआॅक्साईडचे सरासरी प्रमाण सामान्यापेक्षा जास्त आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ इंधनाचा पुरवठा, गॅसवर चालणारे सार्वजनिक वाहन, मेट्रो रेल्वेचा विस्तार, वीज निर्मिती प्रकल्पांना उच्च गुणवत्ता असलेल्या कोळशाचा पुरवठा आणि जेनसेटसाठी कडक उत्सर्जन मापदंड तयार करून ते लागू करण्यात आले आहेत.डोंबिवली/अंबरनाथ११५८७ जळगाव१३०४४बदलापूर१२४८६नवी मुंबई१२०४३ उल्हासनगर१११७९पुणे९२४५ चंद्रपूर१४८-अकोला१३९-मुंबई११७-लातूर११७-जालना१०९-नागपूर१०३-अमरावती१००-नासिक९५-सोलापूर८३-सांगली८०-औरंगाबाद८०-ठाणे७३-
मुंबईसह महाराष्ट्रातील १८ शहरे प्रदूषित
By admin | Published: April 29, 2015 1:47 AM