ऑनलाइन लोकमत
शिमला, दि. 5 - हिमाचल प्रदेशातील बिद्रामनी येथे भीषण बस अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त खासगी बस मंडीहून कुल्लूला जात असताना असताना ब्यास नदीत कोसळून बसचा अपघात झाला. अपघातात 18 प्रवाशांनी जीव गमावला असून 25 जण जखमी आहेत ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती एएसपी कुलभुषण यांनी दिली आहे. जखमींपैकी काही जणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे.
बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. मंडी ते कुल्लूचा रस्ता हा घनदाट असून दरीमधून जातो. रस्ते एकदम अरुंद असून अनेकदा ओव्हरटेक करताना अपघात होत असतो. बस दुपारी पावणे एकच्या सुमारास कुल्लूच्या दिशेने रवाना झाली होती. बिंद्रामनीजवळ पोहोचली असताना ओव्हरटेक करणाऱ्या बाईकला वाचवताना बस नदीत कोसळली आणि जवळपास 50 फूट खोल ब्यास नदीच्या किनाऱ्यावर कोसळली अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे.
याअगोदर शुक्रवारी रात्री गुजरातमधील राजकोट येथे बगोदरा हायवेवर ट्रकने गाडीला दिलेल्या धडकेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.. अपघात इतका भीषण होता की 14 प्रवाशांचा जागच्या जागीच मृत्यू झाला होता.
Death toll rises to 16 after a bus falls into a gorge near Mandi district of Himachal Pradesh (Visuals of injured being taken to hosp) pic.twitter.com/SJizUp7VAL— ANI (@ANI_news) November 5, 2016