नवी दिल्ली : भारतीय उद्योग जगताने २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प विकासाला प्रोत्साहन देणारा असल्याचे स्पष्ट करतानाच रेल्वेने ठेवलेले १.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ पर्यंत तीन नव्या मालवाहतूक कॉरिडॉरवरून वाहतुकीचा खर्च कमी केला जाणार असल्यामुळे उद्योगाला मदत मिळणार आहे.रेल्वेमंत्र्यांनी १.८ लाख कोटी रुपयांचे महसूल उत्पन्नाचे लक्ष्य ठेवत आक्रमक भूमिका अवलंबली आहे. विशेषत: आर्थिक विकासाच्या आघाडीवरील आव्हाने पाहता ते खूप मोठे आव्हान ठरेल.- राजीव ज्योती, एल अॅन्ड टी रेल्वे व्यवहाराचे मुख्य कार्यकारी अधिकारीप्रकल्पांचे काम हाती घेत ते पूर्ण करण्यावर भर देणे ही चांगली बाब आहे. तीन नव्या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरील खर्च कमी होईल.- सुमित मजूमदार, अध्यक्ष भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)मालभाडे धोरण तर्कसंगत बनविणे तसेच सार्वजनिक- खासगी सहभागाच्या धोरणाची समीक्षा केल्यामुळे खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना आकर्षित करण्यास मदत मिळेल.- हर्षवर्धन नेवतिया, फिक्कीचे अध्यक्ष मालवाहतुकीच्या आघाडीवर आम्ही अधिक ठोस पर्यायांची अपेक्षा करीत असताना गुणवत्तापूर्ण उपाययोजना दिसून आल्या.- तिलक राज सेठ, सीआयआय, रेल्वे वाहतूकमालभाड्यात कोणतीही वाढ न करता रेल्वेचा महसूल वाढविला जात असेल तर ती चांगली आर्थिक परिस्थिती ठरेल.-नलीन जैन, जीई वाहतुकीचे सीईओरेल्वेमंत्र्यांनी भांडवली खर्चाच्या आघाडीवर तडजोडीविना मालभाडेवाढ केली नाही. त्यांनी आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतच प्रवासी आणि मालभाड्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.- सुनील कनोरिया, असोचॅमचे अध्यक्ष
‘१.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य आव्हानात्मक ’
By admin | Published: February 26, 2016 2:46 AM