188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 03:46 PM2024-08-18T15:46:42+5:302024-08-18T15:47:53+5:30

अमित शाह म्हणाले, CAA संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. CAA कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही.

188 Pakistani Hindus got Indian citizenship Amit Shah said, Muslims were provoked by CAA | 188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

188 पाकिस्तानी हिंदूंना मिळालं भारताचं नागरिकत्व? अमित शाह म्हणाले, CAA वरून मुस्लिमांना भडकावलं गेलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (18 ऑगस्ट) CAA अंतर्गत 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले. यासंदर्भात अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी लोकांनाही संबोधित केले. यावेली शाह म्हणाले, "फाळणी झाली तेव्हा बांगलादेशात 27 टक्के हिंदू होते, मात्र आज केवळ 9 टक्के शिल्लक आहेत. एवढे हिंदू शेजारील देशातून कुठे गेले? आम्ही 2019 मध्ये CAA घेऊन आलो. CAA मुळे कोट्यवधी हिंदू, जैन आणि शीख समाजाच्या लोकांना नागरिकत्व मिळेल."

अमित शाह म्हणाले, CAA संदर्भात मुस्लिमांना भडकावण्यात आले. CAA कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही. काही राज्य सरकारे CAA बाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. I.N.D.I.A. आणि काँग्रेस CAA बाबत निर्वासितांची दिशाभूल करत आहेत.

काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केलं, आश्वासन पाळलं नाही -
अमित शाह पुढे म्हणाले, "काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या छळ झालेल्या हिंदू, बौद्ध आणि शीखांना न्याय मिळाला नाही. आश्वासन देऊनही या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळाले नाही. अशा कोट्यवधी लोकांना नरेंद्र मोदींनी न्याय दिला आहे."

"मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना आवाहन करतो की, आपण कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता नागरिकत्वासाठी अर्ज करा. आपल्यासोबत काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत," असेही शाह म्हणाले.
 

Web Title: 188 Pakistani Hindus got Indian citizenship Amit Shah said, Muslims were provoked by CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.