कोझिकोड : कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोझिकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. अपघातात अनेकजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी मृतांचा आकडा १० तर जखमींचा आकडा ५० पर्यंत दिला. पण त्याला लगेच अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात २० जणांंचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका वैमानिकाचाही समावेश आहे.
हे विमान बोईग ७३७ होते व ते ठरल्या वेळी म्हणजे साय. ७.४१ वाजता विमानतळावर उतरले. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमानात १७४ प्रौढ प्रवासी, १० तान्ही मुले, दोन वैमानिक व चार विमान कर्मचारी असे एकूण १९० जण होते. कोळीकोडचे विमानतळ डोंगरमाथ्यावर आहे व त्याच्या धावपट्टीच्या दुतर्फा दरी आहे. सुदैवाने धावपट्टीवरून घसरले तेव्हा विमानाचा वेग बराच कमी झाला होता. धावपट्टीची लांबी वाढवण्याची गरज असताना के वळ स्थानिक राजकारणामुळे ते होऊ शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.भाजपाचे केरळमधील ज्येष्ठ नेतेके. जे. अल्फोन्स यांनी याआधी शनिवारीसकाळी मुन्नारजवळ चहामळ््यात कामगारांच्या वसाहतीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत टष्ट्वीटरवर लिहिले की, केरळमध्ये दिवसभारीतील हा दुसरा मोठा आपघात झाला.कोझिकोड येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून त्याच्या पुढच्या भागाचे दोन तुकडे झाले. वैमानिकाचा मृत्यू झाला व कित्येक प्रवासी जखमी जाले. विमानाला आग लागली नाही हे सुदैव.चौकशीचे दिले आदेशनागरी विमान वाहतूक संचालनालयातील सूत्रांनुसार हे विमान मुसळधार पावसातही सुखरूपणे जमिनीवर उतरले.पण नंतर टर्मिनलच्या दिशेने धावत असताना ते धावपट्टीवरून घसरले व बाजूला असलेल्या खोल खड्डयात पडून त्याचे दोन तुकडे झाले.संचालनालयाने मदत व बचाव कार्याची व्यवस्था करण्यासोबतच या घटनेच्या चौकशीचाही आदेश दिला आहे.वैमानिक होते मराठीया विमानाचे सारथ्य कॅ. दीपक वसंत साठे या मराठी वैमानिकाकडे होते. हवाईदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते एअर इंडियात आले होते. १५ वर्षे ते एअर इंडियामध्ये होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यूमुंबई : केरळमधील कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुख्य वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. एअर इंडियात वैमानिक म्हणून रूजू होण्यापूर्वी साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. एनडीएतील शिक्षणानंतर ११ जून १९८१ साली ते लष्करी सेवेत दाखल झाले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. विंग कमांडर दीपक साठे ३० जून २००३ मध्ये लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले. अत्यंत हुशार आणि प्रवीण वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती.