आजपासून बरोबर 54 वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धात हाजीपीरवर कब्जा करत तेथे तिरंगा ध्वज फडकावला होता. 28 ऑगस्त, 1965 रोजी भारतीय जवान पीओकेमध्ये तब्बल 8 किलोमीटर आत घुसले होते आणि त्यांनी हाजीपीरसह इतरही अनेक पोस्टवर तिरंगा फडकावला होता.
1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर याच युद्धात रणगाड्यांचा सर्वाधिक वापर करण्यात आला होता.
या युद्धावेळी, मेजर रंजीत सिंह दयाल हे 1 पॅराच्या जवानांचे नेतृत्व करत होते. ते हैदराबाद नाल्याच्या दिशेने कूच करत होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी केवळ शंकरपाळे आणि बिस्किट एवढेच साहित्य होते. मात्र, त्यांचे अंतिम लक्ष होते, हाजीपीर पास.
तेव्हा भारत आणि पाकिस्तान दोघेही हाजीपीर पासला अभेद्य मानत होते. हा पास अशा ठिकाणी होता, जेथे अगदी कमी जवानांसह प्रबळातील प्रबळ शत्रूपासूनही बचाव करणे सहज शक्य होते. कारण हाजीपीर पासवर चढण्याचा मार्ग निसरडा, खोल आणि लांब होता. केवळ अंधाऱ्या रात्रीच तेथपर्यंत पोहोचण्याचा विचार केला जाऊ शकत होता.
धो-धो बरसणारा पाऊस आणि काळोखाची रात्र, अशा परिस्थितीत मेजर दयाल यांना सकाळपर्यंत हाजीपीर पासच्या शिखरावर पोहोचायचे होते. या ऑपरेशनला उशीर झाला असता आणि दिवस उजाडला असता, तर हे सर्व जवान अगदी सहजपणे शिखरावर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची शिकार ठरले असते.
...म्हणून महत्वाचे होते हाजीपीर -पहाडांतील लढाई नेहमीच शिखरांवर लढली जाते. यामुळे रणनीतीच्या दृष्टीने शिखरांवर कब्जा असने महत्वाचे असते. कारण शिखरांवर शत्रू असेल तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत अवघड असते.
हाजीपीरवर कब्जा असेल, तर तेथून पुंछ ते श्रीनगर अंतर केवळ 50 ते 55 किलो मीटर एवढे आहे. मात्र, हाजीपीरवर कब्जा नसेल, तर पुंछ येथून श्रीनगरला जाण्यासाठी जम्मूला जावे लागते आणि मग तेथून श्रीनगर आणि नंतर उरीला जावे लागते. हा रस्ता जवळपास 600 ते 650 किलोमीटर एवढा लांब आहे.
दोन बाजूंनी हल्ला करण्याची योजना -युद्धाच्या वेळी या हाजीपीरवर कब्जा करण्यासाठी दोन बाजूंनी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती. यात, पश्चिमेकडून 1 पॅराला शिखरावर कब्जा करण्याचा आदेश देण्यात आला होता. तर पंजाब रेजिमेंटला हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला होता.
जबरदस्त लढाईनंतर कंपनीला कब्जा करण्यात यश -येथे जबरदस्त लढाई झाल्यानंतर अरविंदर सिंह यांच्या कंपनीला कब्जा करण्यात यश मिळाले. यानंतर त्यांचे येथील काम संपले. हाजीपीरवर दुसरीच कंपनी हल्ला करणार होती. मात्र, मेजर दयाल यांनी आपल्या कंपनीला हाजीपीरवर हल्ला करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या समोर जवळपास 1500 फुटांची सरळ चढाई होती. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर दयाल यांच्या कंपनीने चढाईला सुरुवात केली. यावेळी त्यांना रस्त्यातच एक झोपडी दिसली. त्यातून आवाज येत होता. त्यात 11 पाकिस्तानी सैनिक होते. त्यांना भारतीय जवानांनी घेरून ताब्यात घेतले.
यानंतर, सकाळी 8 वाजता दयाल यांची कंपनी शिखरावर पोहोचली. तोपर्यंत पाकिस्तानी सैनिकांनी दारूगोळा सोडून तेथून पळ काढला होता. यासंपूर्ण काळात बंदी केलेल्या सैनिकांचा भारतीय सैनिकांनी आपल्याकडील साहित्य उचलण्यासाठी वापर केला. हाजीपीर येथील पराक्रमासाठी मेजर आरएस दयाल यांना नंतर महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
केवळ 65 जवानांसह केला हल्ला - यासंदर्भात मेजर अरविंदर सिंग यांनी सांगितले आहे, की त्यांनी तेथे जे पाहिले, ते पाहून त्यांच्या पायाखालची मातीच सरकली. कारण तेथे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण अरविंदर यांच्याकडे केवळ 65 जवन होते. अरविंदर यांनी सांगितले आहे, की आमची पाकिस्तानी सैनिकांशी हातानेच लढाई झाली. यात भारताच्या 23 जवानांचे नुकसान झाले. मात्र आम्ही हाजीपीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवते. यानंतर भारतीय जवानांत पायावर उभे राहण्याचेही त्राण उरले नव्हते.माझ्यावरही ग्रेनेट हल्ला झाला होता. यात माझ्या पायाचा एक भागही उडाला होता. गंभीर दुखापत झाली होती. मात्र, तरीही मला वेदना होत नव्हती, असेही अरविंदर यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा