1984 Anti Sikh Riots : मंडोली कारागृहातील बॅरेक क्रमांक 14मध्ये राहणार सज्जन कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:44 PM2018-12-31T16:44:44+5:302018-12-31T16:46:43+5:30
1984 Anti Sikh Riots : 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली.
नवी दिल्ली - 1984 साली झालेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले काँग्रेसचा माजी नेता सज्जन कुमारनं सोमवारी (31 डिसेंबर) कड़कड़डूमा कोर्टासमोर आत्मसमर्पण केले. यानंतर मंडोली कारागृहात कुमारची रवानगी करण्यात आली. येथे बॅरेक क्रमांक 14 मध्ये त्याला ठेवण्यात येणार आहे. 17 डिसेंबर रोजी दिल्ली हायकोर्टानं सज्जन कुमारला शीखविरोधी दंगलीप्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिवाय, 31 डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही दिले होते.
यानंतर, दरम्यान, सज्जन कुमारनं आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली हायकोर्टात केला होता. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे आत्मसमर्पणाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि 31 डिसेंबर रोजीच आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.
(1984 Anti Sikh Riots : सज्जन कुमारचे आत्मसमर्पण, मंडोली कारागृहात रवानगी)
#Latestvisuals Delhi: Sajjan Kumar, who was awarded life sentence by Delhi High Court in 1984 anti-Sikh riots case, to surrender before Karkardooma Court or Tihar jail authorities today pic.twitter.com/tgnHrWD81r
— ANI (@ANI) December 31, 2018
(1984 शीख विरोधी दंगल प्रकरण: काँग्रेस नेते सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा)
17 डिसेंबरला दिल्ली हायकोर्टानं शीखविरोधी दंगलीप्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत सज्जन कुमारला दोष ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आपला निकाल देताना कोर्टानं म्हटले होते की, '1984 शीखविरोधी दंगलीमध्ये दिल्लीतील 2700 शीख नागरिकांची हत्या करण्यात आले होती आणि हे हत्याकांड म्हणजे अविश्वसनीय नरसंहार होता.
1984 anti-Sikh riots case: Convict Sajjan Kumar brought to Delhi's Mandoli Jail. He surrendered before Karkardooma Court earlier today. https://t.co/1ziBhiICY7">pic.twitter.com/1ziBhiICY7
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1079677541114245121?ref_src=twsrc%5Etfw">December 31, 2018
34 वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमारची सुटका केली. या निकालाला सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं. दिल्लीच्या कँटॉनमेंटच्या अगदी समोर ही घटना घडली, त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं, असा प्रश्न सुनावणीवेळी न्यायालयानं विचारला होता.
Lawyer of convict Sajjan Kumar after he surrendered before Delhi's Karkardooma Court in 1984 anti-Sikh riots case: Court has sent him to Mandoli Jail. Court has also ordered that a separate van would be provided for his movement due to security reasons. https://t.co/OfypwRARkJ">pic.twitter.com/OfypwRARkJ
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1079672278470647808?ref_src=twsrc%5Etfw">December 31, 2018
1984 anti-Sikh riots case: Convict Sajjan Kumar reaches Delhi's Karkardooma Court to surrender https://t.co/lJ1JzCDWJ2">pic.twitter.com/lJ1JzCDWJ2
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1079660246568747011?ref_src=twsrc%5Etfw">December 31, 2018