नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज नवी दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत सज्जन कुमार यांना दोषी ठरवले. कुमार यांना शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहभागाबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले आहेत.
(1984 शीख विरोधी दंगल प्रकरण : हा तर ऐतिहासिक निर्णय- हरसिमरत कौर) दरम्यान, न्यायालयानं 31 डिसेंबरपर्यंत कुमार यांना आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी सज्जन यांनी न्यायालयाकडे थोडा कालावधी देण्याची मागणी केली आहे. सज्जन कुमार यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.