नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे बीएसएफच्या दोन जवानांचा गुरुवारी मृत्यू झाला. तर ४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास १९१ बीएसएफच्या जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, या जवानांच्या मृत्यूबद्दल बीएसएफच्या महासंचालकांनी शोक व्यक्त केला आहे.
बहुतेक जवान पोलिसांसोबत कायदा-सुव्यवस्थेसाठी ड्युटी बजावत होते. अनेक जवान असिम्प्टोमॅटिक होते. म्हणजेच त्यांना आधी कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. जे जवान कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. त्यांना क्वारंटाईन केले आहे. कोरोनासंदर्भात जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन बीएसएफद्वारे करण्यात येत आहे.
दरम्यान, बुधवारी राजस्थानमधील जोधपूरमध्ये बीएसएफच्या ३० जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. कोरोनाची लागण झालेले जवान एका कंपनीत होते. या कंपनीत ६५ जवान होते. त्यांना सुरक्षेसाठी जयपूरहून दिल्लीला पाठवण्यात आले होते. ते राजनाधीत जामा मशिदीत तैनात होते. त्यांना जोधपूरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आणण्यात आले आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus : कोरोनाला हरवण्यात राजस्थान आघाडीवर; ४७ टक्के रुग्ण बरे, ५ जिल्हे संक्रमणमुक्त
छत्रपती संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटनंतर देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
Zomato दारूची होम डिलिव्हरी करण्याच्या तयारीत, कंपनीने पाठविला प्रस्ताव...