ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - मागच्या दोन दिवसात एकटया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण २ कोटी २८ लाख व्यवहार झाले आहेत. हे सर्व नोटा बदलण्याचे, पैसे भरण्याचे आणि पैसे काढण्याचे व्यवहार आहेत. एसबीआयमध्ये एकूण ४७८६८ कोटी रुपये डिपॉझिट झाले असून, ५८ लाख लोकांनी नोटा बदलल्या आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
सध्याच्या एटीएममशीन्समध्ये ५०० आणि १ हजार रुपये देण्याची रचना आहे. नव्या नोटांसाठी एटीएम मशीन्सची रचना बदलण्याचे काम सुरु असून त्याला अजून काही वेळ लागेल.
आधीच एटीएम मशीन्सची रचना नव्या नोटांसाठी बदलली असती तर गुप्तता राहिली नसती असे जेटली यांनी सांगितले. बँकेचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत असून लोकांनीही संयम दाखवून सहकार्य केल्याबद्दल जेटलींनी आभार मानले.