कुमारस्वामी म्हणतात, 'माझं सरकार स्थिर; मी पूर्णपणे निश्चिंत'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 05:42 PM2019-01-15T17:42:12+5:302019-01-15T18:26:28+5:30
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झाले आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पण कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नसल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला आहे. 'माझं सरकार स्थिर आहे आणि मी पूर्णतः निश्चिंत आहे', अशी प्रतिक्रिया एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कुमारस्वामी यांनी हा दावा केला आहे.
नेमके काय म्हणाले कुमारस्वामी?
मला माझे सामर्थ्य माहिती आहे. काळजी करू नका, माझे सरकार पूर्णतः स्थिर आहे. गेल्या आठवड्यापासून आमच्या कन्नड टीव्ही चॅनेल्सवर जे काही दाखवले जात आहे, ते पाहून मी त्याचा आनंद घेत आहे. दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपाला समर्थन देणार असल्याची घोषणा केली आहे. पण यामुळे भाजपाला समर्थन असलेल्यांची संख्या अशी कितीशी वाढणार आहे?, असा प्रश्नही यावेळेस कुमारस्वामी यांनी उपस्थित केला.
Karnataka CM HD Kumaraswamy on 2 Independent MLAs withdraw support from Karnataka government: If 2 MLAs withdraw their support, what will be the numbers? I'm totally relaxed. I know my strength. Whatever is going on in media in the past week, I am enjoying pic.twitter.com/vsmmbdBXSY
— ANI (@ANI) January 15, 2019
दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारचा मंगळवारी (15 जानेवारी) पाठिंबा काढून घेतला. मकर संक्रांतीचा दिवस असल्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत.
तर एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारवर हल्लाबोल करत म्हटले की, काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे.
तत्पूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोरदार प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं काँग्रेसचे काही आमदार गळाला लावले असून, 17 जानेवारीपर्यंत भाजपा सरकार पाडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता.
2 Independent MLAs, H Nagesh and R Shankar, withdraw their support from Karnataka govt. pic.twitter.com/C34u3BNFOb
— ANI (@ANI) January 15, 2019
कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत.
H Nagesh, Independent MLA :My support to coalition govt was to provide good&stable govt which utterly failed. There's is no understanding among coalition partners. So, I decided to go with BJP to install stable govt & see that govt performs better than the coalition. #Karnatakapic.twitter.com/hcMnaXaHZd
— ANI (@ANI) January 15, 2019
Independent MLA, R Shankar: Today is Makar Sankranti, on this day we want a change in the govt. The govt should be efficient, so I am withdrawing my support (to the Karnataka govt) today. pic.twitter.com/LscHTp6gJZ
— ANI (@ANI) January 15, 2019