ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 24 - हैदराबादमधील फिल्मनगर येथे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली 10हून जास्त कामगार दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. ढिगा-याखालून बाहेर काढलेल्या तीन जखमी कामगारांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. ढिगा-याखाली आणखी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ज्युबिली हिल परिसरातल्या फिल्मनगरमधल्या सांस्कृतिक केंद्राजवळ ही तीन मजली इमारत बांधली जात होती. त्यावेळीच अचानक बिल्डिंग कोसळली आणि त्या ढिगा-याखाली 10 हून अधिक लोक अडकले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.