नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील २,६३,९१३ पदे रिक्त असून, सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये १,१४,२४५ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत कनिमोई करुणानिधी, एम सेल्वराज, कौशलेंद्र कुमार, पीआर नटराजन आणि हिबी इडेन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै २०२३ पर्यंत, रेल्वेमध्ये राजपत्रित संवर्गाची २,६८० पदे आणि अराजपत्रित संवर्गाची २,६१,२३३ पदे रिक्त आहेत.
दीड लाख जागांसाठी भरती सुरूरेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.
कमतरता कुठे ? - केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत. - केंद्रीय गृह मंत्रालय आणि त्याअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या सुमारे १,१४,२४५ जागा रिक्त आहेत.
जवानांचा जॉबला टाटा २०१८ १०,९४०२०१९ १०,३२३२०२० ७,६९०२०२१ १२,००३२०२२ १२,३८०
पाच वर्षांत ५३,३३६ जवानांनी सोडली नोकरी- गेल्या पाच वर्षांत (२०१८ ते २०२२) ५३,३३६ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. - ४७ हजार सैनिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याच वेळी ६,३३६ जवानांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली.
आत्महत्याही वाढल्या : २०१८ ते २०२२ दरम्यान एकूण ६५८ जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २३० सीआरपीएफ, १७४ बीएसएफ, ९१ सीआयएसएफ, ६५ एसएसबी, ५१ आयटीबीपी आणि ४७ आसाम रायफल्सच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. दर वर्षामध्ये आत्महत्या करणाऱ्या जवानांचे प्रमाण वाढत आहे.
नोकरी सोडण्याचे प्रमाण कुठे वाढले? बीएसएफ २३,५५३सीआरपीएफ १३,६४०सीआयएसएफ ८० भारत तिबेट पोलिस ३,१६५सशस्त्र सीमा दल २,४३४