नवी दिल्ली : पाकिस्तानातीलभारतीय राजदूतावासात काम करीत असलेले दोन भारतीय कर्मचारी सोमवारी ड्युटीसाठी बाहेर पडल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्याला सज्जड दम भरून जाब विचारताच या दोन भारतीयांना सोडून देण्यात आले आहे.पाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांचे संरक्षण करणे ही तेथील जबाबदारी आहे, असे या भारताकडून निक्षून सांगण्यात आले. पाकिस्तानात दोन भारतीय कर्मचाºयांना अटक केल्याचे तीव्र पडसाद उमटले. दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या गाड्यांसह भारतीय दूतावासात परत पाठववावे, असे पाकला सुनावण्यात आले. कठोर शब्दात खडसावले जाताच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही भारतीय कर्मचाऱ्यांना इस्लामाबादमधील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याचे मान्य केले आणि काही वेळातच त्यांना सोडून दिल्याची माहिती दिली.हे दोन्ही कर्मचारी दूतावासातील ड्ऱायव्हर असून मूळचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आहेत. त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. हे दोघेही सोमवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घरून निघाले, परंतु कामावर पोहचलेच नव्हते. गेल्या महिन्यात भारतातील दोन पाकिस्तानी कर्मचाºयांना हेरगिरी केल्यावरून ताब्यात घेतले होते. त्यामुळे पाकनेही दोन भारतीयांना गायब केले असावे, असा अंदाज आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी इस्लामाबादमधील भारतीय राजदूतावासातील अधिकाºयांना त्रास देण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत. भारतीय राजदूत गौरव अहलुवालिया यांच्यासह इतर अधिकाºयांनाही पाकिस्तानी यंत्रणांनी त्रास दिला आहे. अहलुवालिया यांच्या घराजवळ पाकिस्तानी यंत्रणांच्या व्यक्तींनी केलेल्या भीतीदायक वर्तनाबाबत भारताने तक्रार केली आहे. पाकिस्तानी व्यक्तींनी अहलुवालिया यांच्या वाहनाचा दुचाकीवरून पाठलाग केलेल्या पाठलागाचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. (वृत्तसंस्था)छळ होता कामा नयेपाकिस्तानच्या भारतातील दूतावासातील अधिकारी सय्यदहैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलवून जाब विचारण्यात आला. या दोन्ही अधिकाºयांची चौकशी किंवा कोणत्याही प्रकारचा छळ होता कामा नये, असेही भारताने बजावले.
दम भरताच पाकिस्तान वठणीवर; दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:26 AM