शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

लाल किल्ल्याजवळून आयएसच्या 2 दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 5:33 PM

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काल रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. जामा मशीदीजवळच्या बस थांब्यावर थांबले असताना ताब्यात घेतले. या दहशतवाद्यांचे नाव परवेज आणि जमशेद असे असून ते इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. या दोघांकडे दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईल ...

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काल रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. जामा मशीदीजवळच्या बस थांब्यावर थांबले असताना ताब्यात घेतले. 

या दहशतवाद्यांचे नाव परवेज आणि जमशेद असे असून ते इस्लामिक स्टेट इन जम्मू कश्मीर या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. या दोघांकडे दोन पिस्तुल, 10 काडतुसे आणि 4 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही शस्त्रे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये खरेदी केली होती. तसेच दोघेही दिल्लीहून काश्मिरला जाणार होते. 

सुत्रांनुसार हे दोघेही काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. जानेवारीमध्ये एका चकमकीत परवेजचा दहशतवादी भाऊ मारला गेला होता. परवेज हा आधी हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधीत होता नंतर तो आयएसजेकेमध्ये गेला. 

या दोघांचाही दिल्लीमध्ये दहशवादी कारवाया करण्याचा हेतू नव्हता. त्यांनी चौकशीमध्ये आयएसजेकेचा प्रमुख उमर नजीर आणि उपप्रमुख आदिल थोकर असल्याचे सांगितले. ते थोकरच्या आदेशानुसार दिल्लीला आले होते. त्यांना सध्या 5 दिवसांची पोलीस कोठडीत पाठविले आहे.

टॅग्स :Red Fortलाल किल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीdelhiदिल्लीISISइसिस