शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 7:21 PM

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा साठा आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला.

काश्मीर : जम्मू काश्मीरच्या अवंतिपोरा विभागातील त्राल सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात शनिवारी चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारानुसार या दोन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आल्या.

त्राल सेक्टरच्या हारदुमीर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्या चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अद्यापही चकमक आणि शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. त्राल भागात ठार झालेले दहशतवादी या लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं. या दोन दहशतावाद्यांची नावे नदीम भट आणि रसूल आदिल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्फोट घडवून आणण्याच्या कामासाठी त्यांना संघटनेत दाखल करून घेतले होते. या पूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि ग्रेनेडच्या स्फोटात यांचा सहभाग असल्याचेही विजय कुमार यांनी सांगितलं. 

शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जम्मू काश्मीरच्या शोपियान भागातील चौगाम येथेही चकमक झाली होती. त्या चकमकीनंतर थोड्या वेळातच काश्मीर झोन पोलिसांनी दहशतवाद्यांना निष्क्रीय केल्याची माहिती दिली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीForceफोर्स