श्रीनगर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखल्याचे समजते. त्यातच, आज पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली आहे. त्यामध्ये, दोन दशहतवाद्यांना कंठस्नान देण्यात आलं आहे.
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. मात्र, जवानांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.
पाकिस्तानातही टीटीपी दहशतावाद्यांचा हल्ला
पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात दोन दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.